अभिनेता सोनू सूदनं (Sonu Sood) कोरोना काळात अनेकांना सढळ हाताने मदत केली.



कोरोना लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कामगारांसाठी सोनू तर मसीहाच ठरला होता.



सोनूनं लोकांच्या मदतसाठी खर्च केलेल्या पैशांवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.



काही दिवसांपूर्वी आप की अदालत कार्यक्रमात बोलत असताना सोनूनं या मदतीसंदर्भात मोठा खुलासा केला आहे.



आप की अदालत या कार्यक्रमात सोनूला मदतीची प्रेरणा आणि त्यासाठी जमा केलेले पैसे कुठून आले? हा प्रश्न विचारण्यात आला.



'माझ्याकडे जेवढे ब्रॅंड होते, त्या सगळ्यांना मी डोनेशन जमा करण्यास सांगितलं. या कामात मी डॉक्टर, विद्यार्थी, औषध बनवणाऱ्या कंपन्या, शिक्षक सगळ्यांना बरोबर घेतलं' असं सोनूनं सांगितलं.



सोनू सूदनं पुढे बोलताना सांगितलं की, मला अनेक मोठ्या NGOs मधून फोन आले. ते म्हणाले की, देशाच्या 130 कोटींच्या लोकसंख्येसमोर माझा निभाव लागणार नाही. त्यावर मी त्यांना सांगितलं की, जे लोक मदतीच्या आशेनं माझ्या घराखाली येतात, त्यांना मी नाही म्हणू शकत नाही. '



सोनूनं हेदेखील स्पष्ट केलं की, त्याचं सोशल मीडिया सांभाळायला कोणतीही टीम त्यानं ठेवली नव्हती. तो स्वतःहून प्रत्येक ट्वीटला उत्तर द्यायचा. सोनूनं कोविड काळात त्याच्या घरी आलेल्या प्रत्येकाला, तसेच सोशल मीडियावर मदत मागणाऱ्या प्रत्येकाला मदतीचा हात पुढे केला होता.



सोनू सूदच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वी तो पृथ्वीराज सिनेमात दिसून आला होता.



सध्या सोनू त्याच्या नव्या प्रोजेक्टवर काम करत आहे. सोनू लवकरच आगामी चित्रपट फतेहमध्ये दिसून येणार आहे.