दृश्यम-2 हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. दृश्यम या चित्रपटाच्या पहिल्या भागाप्रमाणेच दुसऱ्या भागाला (Drishyam 2) देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 'दृश्यम 2'चे ओपनिंग डे कलेक्शन 15.38 कोटी रुपये होते. दृश्यम-2 चित्रपटानं 13 व्या दिवशी 4.50-4.90 कोटींची कमाई केली. आता 13 व्या दिवसाच्या कलेक्शननंतर या चित्रपटाची आतापर्यंतची एकूण कमाई जवळपास 160 कोटी झाली आहे. दृश्यम-2 हा चित्रपट लवकरच 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असं म्हटलं जात आहे. दृश्यम-2 जर 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला, तर हा अजयचा 200 कोटी कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरेल. दृश्यम-2 या चित्रपटाची निर्मिती 50 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. 'दृश्यम 2' या मल्याळम सिनेमाचा हा हिंदी रिमेक आहे . अजयच्या 2015 मध्ये रिलीज झालेल्या दृश्यम या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.