बिग बी हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील आठवणी नेहमी चाहत्यांसोबत शेअर करतात
नुकत्याच एका ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन यांनी कोलकाता (Kolkata) येथील ब्लॅकर्स कंपनीतील त्यांच्या नोकरीबाबत सांगितलं.
अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये एका ट्वीटचा स्क्रिनशॉर्ट शेअर केला.
ब्लॅकर्स कंपनीत अमिताभ हे नोकरी करत होते तेव्हा त्यांना 1640 रुपये पगार होता 30 नोव्हेंबर 1968 हा अमिताभ बच्चन यांच्या नोकरीचा शेवटचा दिवस, असंही या ट्वीटमध्ये लिहिण्यात आलं आहे.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कोलकातामधील आठवणींना उजाळा दिला.
'ते दिवस कलकत्ता (आता कोलकाता) मधील होते. फ्री.. फ्रीडम.. फ्रीइस्ट... असे ते दिवस होते. आम्ही 8 जण दहा बाय दहाच्या खोलीत राहात होतो.' असं बिग बींनी ब्लॉगमध्ये लिहिलं.
अमिताभ बच्चन हे कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतात.
अमिताभ बच्चन यांचा 'ऊंचाई' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला.
बिग बींच्या आगमी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.