इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारतानं पाच विकेट्सनं विजय मिळवला.



या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेवर नाव कोरलं.



भारताच्या विजयात भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) मोलाचा वाटा उचलला.



या सामन्यात न्यूझीलंडनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची फलंदाजी ढासळली. परंतु, ऋषभ पंतनं हार्दिक पांड्यासोबत मोठी भागेदारी करत भारताला विजय मिळवून दिला.



या सामन्यात ऋषभ पंतनं 113 चेंडूत नाबाद 125 धावांची खेळी केली. तर, हार्दिक पंड्यानं 55 चेंडूत 71 धावांचं योगदान दिलं.



या शतकीय कामगिरीसह ऋषभ पंतनं नव्या विक्रमाला गवसणी घातलीय.



आशियाबाहेर शतक झळकावणारा तो तिसरा भारतीय विकेटकिपर ठरलाय.



भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडनं सर्वात प्रथम 1999 मध्ये श्रीलंकेविरुद्ध आशियाबाहेर शतक झळकावलं होतं.



तब्बल 21 वर्षानंतर भारताचा युवा फलंदाज आणि विकेटकिपर केल राहुलनं न्यूझीलंडविरुद्ध 2020 मध्ये शतक केलं होतं.



त्यानंतर आशियाबाहेर शतक ठोकणाऱ्या ऋषभ पंत तिसरा भारतीय विकेटकिपर आहे.