अहमदनगर : शिर्डीच्या साईबाबांना (Sai baba) एका आठवड्यात कोट्यवधी रूपयांचं दान जमा झालंय.

ख्रिसमसच्या सुट्ट्या‌ आणि त्यानंतर नविन वर्षानिमित्त भक्तांनी साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती.

25 डिसेंबर 2022 ते 2 जानेवारी 2023 या काळात साईबाबांना तब्बल 17 कोटी 81 लाख रूपयांचं दान जमा झाले आहे.

25 डिसेंबर ते 2 जानेवारी या काळात दानपेटीत 8 कोटी 78 लाख 79 हजार जमा झाले आहेत.

देणगी काउंटरद्वारे 3 कोटी 67 लाख 67 हजार 698 रुपये मिळाले आहेत.

डेबीट आणि क्रेडीट कार्डद्वारे 2 कोटी 15 लाख 18 हजार रूपये जमा झाले आहेत.

ऑनलाइन देणगी 1 कोटी 21 लाख रूपये जमा झाले आहेत.

मनिऑर्डरद्वारे 32 लाख रूपये संस्थानला जमा झाले आहेत.

९० लाख 31 हजार रुपयांचे 1 किलो 849 ग्राम सोने आणि 6 लाख रुपयांच्या 16 किलो चांदी जमा झाली आहे.

25 डिसेंबर रोजी ख्रिसम आणि त्यानंतर नवीन वर्षानिमित्त भाविकांनी साईबाबांच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती.