आजकाल प्रत्येक घरात स्टीलची भांडी वापरली जातात. या मागचे सर्वात मोठे कारण म्हणजे याला गंज लागत नाही. आपण बऱ्याच वेळा बघतो की, लोखंड गंज लागून खराब होते. लोखंडापासूनच स्टीलची निर्मिती होत असली तरी स्टील हे गंजत नाही. तुम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का स्टील ला गंज का लागत नाही? स्टीलला गंज लागू नये यासाठी यात निकेल आणि क्रोमियम मिसळले जाते. निकेल आणि क्रोमियम मुळेच स्टीलला गंज लागत नाही. स्टेनलेस स्टील दूषित वातावरणाच्या संपर्कात आल्यावरच खराब होते. घरात वापरली जाणारी भांडी स्टेनलेस स्टील पासून बनवली जात नाहीत. याची विशेषतः हीच आहे की, हे अधिक तापमान सहन करू शकते.