बाजारातील दरापेक्षा कमी दारात सरकार सोने खरेदीची संधी देतेय. अनेक जण हे गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करता. सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड योजना भारतीय रिझर्व्ह बँक चालवत आहे. सॉव्हरिन गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना रिटर्नच्या बदल्यात, दर वर्षी 2.5 टक्के फिक्स व्याज दिले जाते. हे सोनं खरेदी करण्यासाठी जीएसटी आणि आकारले जात नाही. 18-22 डिसेंबर पर्यंत एसजीबी सिरीज 3 आणि 12-16 फेब्रुवारी पर्यंत सिरीज 4 उघडेल. सॉव्हरिन गोल्ड बॉण्डचा फायदा करून घेण्याची ग्राहकांना उत्तम संधी मिळत आहे. डिजिटल पद्धतीने अर्ज केल्यास सरकार 50 रुपये प्रति ग्रॅम ने सूट देते. सॉव्हरिन गोल्ड बॉण्डची परिपक्वता ही 8 वर्षाची असते.