ब्रोकोली ही हिरवी फळभाजी असून त्यात कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात.
ब्रोकोली खाल्ल्यामुळे शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर होते आणि हाडे मजबूत राहतात.
ब्रोकोली खाल्ल्याने यकृत निरोगी राहते.
वजन कमी करण्यासाठी ब्रोकोलीचे सॅलड आणि सूप आरोग्यास फायदेशीर असते.
ब्रोकोलीचा आहारात समावेश केल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
ब्रोकोली खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि मधुमेहापासून आपले संरक्षण होते.
ब्रोकोलीमधील पोषक तत्वे तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
ब्रोकोली त्वचेचा संसर्ग होण्यापासून वाचवते.
ब्रोकोलीमुळे पचनक्रिया सुरळीत चालते.
ब्रोकोलीमध्ये असलेल्या फायबरमुळे बद्धकोष्ठासारख्या समस्या दूर होतात.