आजकालचे स्मार्टफोन फुल चार्ज झाल्यावर बॅटरीला होणारा वीजपुरवठा बंद करतात.
असं असलं तरी लोकांनी रात्रभर मोबाईल चार्जिंगला लावू नये, असं तज्ज्ञ सांगतात.
नवीन फोनमध्ये स्मार्ट टेक्नोलॉजी असली तरी जुने फोन तितके अवगत नाहीत.
जुन्या फोनमध्ये चार्जिंग पूर्ण झाल्यानंतरही चार्जिंग सुरू ठेवल्यास बिघाड होऊ शकतो.
चार्जिंगच्या वेळी मोबाईल गरम झाल्यास घाबरू नका.
चार्जिंगदरम्यान रासायनिक क्रिया होत असल्याने मोबाईल तापतो.
रात्रभर चुकून स्मार्टफोन चार्जिंगला राहिला तरी काळजी करण्याचं कारण नाही.