बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आज (3 मार्च) तिचा 35वा वाढदिवस साजरा करत आहे. श्रद्धाचा जन्म 3 मार्च 1987 रोजी मुंबईत झाला. ती अभिनेते शक्ती कपूर आणि शिवांगी कोल्हापुरे यांची मुलगी आहे.
अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवणाऱ्या श्रद्धा कपूरला गाण्याचीही खूप आवड आहे. श्रद्धा कपूरच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्याशी संबंधित काही खास गोष्टी...
श्रद्धा कपूरने तिचे शालेय शिक्षण जमनाबाई नरसी स्कूल आणि अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे येथून केले आहे. शालेय शिक्षणानंतर, अभिनेत्री मानसशास्त्रात पदवी मिळविण्यासाठी बोस्टन विद्यापीठात गेली होती. परंतु, चित्रपट मिळाल्यावर तिने हे शिक्षण अर्धवट सोडले.
श्रद्धा कपूरने 2010 मध्ये अंबिका हिंदुजाच्या ‘तीन पत्ती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात आर माधवन आणि अमिताभ बच्चन यांच्याही भूमिका होत्या.
चित्रपटात येण्यापूर्वी श्रद्धा एका कॉफी शॉपमध्ये काम करत होती. तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, बोस्टनमध्ये शिकत असताना, पॉकेटमनीसाठी कॉफी शॉपमध्ये काम केले होते.
अभिनेत्री श्रद्धा कपूर हिंदी, इंग्रजी, मराठी, ब्रिटीश आणि रशियन भाषेसह अनेक भाषांमध्ये बोलू शकते. ‘आशिकी 2’ या हिट चित्रपटामुळे श्रद्धा रातोरात स्टार बनली. तिने ‘हैदर’, ‘बागी’, ‘स्त्री’, ‘साहो’ आणि ‘छिछोरे’ यासह अनेक चित्रपटांमध्ये काम करत, चाहत्यांची मने जिंकली आहेत. (Photo : @shraddhakapoor/IG)