सरोगेसीद्वारे प्रियांका आणि निकने त्यांच्या बाळाला जन्म दिला आहे.
बाळाच्या जन्मापासून आतापर्यंत प्रियांका आणि निकने बाळाची कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.
प्रियांकाला मुलगा झाला की मुलगी, हा प्रश्न चाहत्यांना पडला होता.
मीडिया रिपोर्टनुसार त्यांच्या घरी चिमुकल्या परीचे आगम झाले.
लेकीच्या जन्माच्या चार महिन्यानंतरही प्रियांका आणि निकने तिचे नामकरण केले नव्हते. मात्र, आता त्यांच्या लेकीचे नाव समोर आहे.
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार निक आणि प्रियांकाने त्यांच्या लेकीचे नाव ‘'मालती मेरी चोप्रा जोनास' असे ठेवले आहे.