पावसाळ्यात केस गळणे आणि केस तुटण्याची समस्या जास्त असते.



दमट वातावरणामुळे किंवा केस ओले राहिल्यामुळे पावसाळ्यात केस गळतीचे प्रमाण वाढते.



केसगळतीवर उपाय म्हणून बाजारात अनेक खर्चिक प्रोडक्ट उपलब्ध आहेत.
पण, तुम्ही घरच्या घरी सोपा उपाय करुन केसांच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता.


खोबरेल तेल आणि जास्वंद यांच्यापासून तयार केलेलं तेल



साहित्य : एक कप खोबरेल तेल, एक मूठभर कढीपत्ता, दोन चमचे आवळा पावडर किंवा
सुकलेला आवळा, दोन टीस्पून मेथी दाणे, दोन जास्वंदाची फुलं


एक काचेची बॉटल घ्या आणि त्यामध्ये खोबरेल तेल ओता.



आता त्यात कढीपत्ता, आवळा पावडरसह इतर सर्व साहित्य टाका आणि झाकण घट्ट बंद करा.



एक ते दोन आठवडे हे बॉटल दररोज सुमारे 3 तास सूर्यप्रकाशात ठेवा.



या तेलाचा रंग गडद होईपर्यंत या तेलाला सूर्यप्रकाश दाखवा.



तेलाचा रंग गडद झाल्यानंतर हे तेल वापरासाठी तयार आहे.
तेल हलकं गरम करा आणि केसांना मॉलिश करा.