दिवाळीसाठी लाईटींग खरेदी करताना 'या' 5 चुका टाळा!



दिवाळी काही दिवसांवर आली असून सर्वत्र खरेदीला सुरुवात झाली आहे.



तुम्हीही तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये सजावटीसाठी लाईटींग खरेदी करण्याची तयारी करत असाल तर ते खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवा.



चांगल्या ब्रँडच्या लाईट्स खरेदी करा. हे सुरक्षिततेसाठी आणि लाईटींग जास्त काळ टिकण्यासाठी देखील महत्वाचं आहे.



चांगल्या ब्रँडचे दिवे आणि लाईट्स दीर्घकाळ टिकतात आणि शॉर्ट सर्किट प्रूफ देखील असतात.



स्मार्ट लाइटिंगद्वारे तुम्ही पैसे वाचवू शकता. स्मार्ट लाइट्समधील एलईडी पर्यायांमुळे तुम्ही पारंपारिक दिव्यांपेक्षा जास्त वीज वाचवता येते.



किफायतशीर आणि वीज कमी वापरणाऱ्या लाईट्समुळे वीज बिल आणखी कमी करण्यात मदत होते.



साधारण बल्बच्या तुलनेत एलईडी बल्बचे शेल्फ लाइफ जास्त असते.



लाईटींग खरेदी करण्यापूर्वी, तुम्ही कोणत्या ठिकाणी ते लावणार आहात हे ठरवा.



जर तुम्हाला पडद्यावर किंवा बाल्कनीत किंवा देवघरात लाईटींग लावायची असेल तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणासाठी वेगवेगळी लाईटींग मिळेल.



झाडे आणि वनस्पतींसाठी स्ट्रीप लाइट सर्वोत्तम पर्याय आहे. स्ट्रिप लाइट्स लावणं करणे सोपे आहे, त्या सहज झाडांवर टांगता येतात.



पडद्यावरील लाईटींगबाबत काळजी घ्या, त्यांची गुणवत्ता सुनिश्चित करा.



लाईटींग जास्त तापू नये, याची काळजी घ्या, अन्यथा आग लागण्याचा धोका असू शकतो.