काही सोप्या घरगुती उपायांनी लॅपटॉप पूर्णपणे स्वच्छ केला जाऊ शकतो.
लॅपटॉप हा आपल्या दैनंदिन कामाचा सर्वात महत्त्वाचा भाग बनला आहे.
ऑफिसचे काम असो किंवा घरातील मनोरंजन असो, लॅपटॉपशिवाय काम पूर्ण होत नाही.
आपण जवळपास सर्वच ठिकाणी लॅपटॉप वापरतो.
त्यामुळे लॅपटॉपवर विविध प्रकारचे जीवाणू, विषाणू आणि घाण साचते.
लॅपटॉप स्वच्छ ठेवणे खूप महत्वाचे आहे.
यासाठी मऊ कापड किंवा मायक्रोफायबर कापड उपयुक्त आहे.
एक मऊ कापड घ्या आणि त्यात थोडे डिस्टिल्ड वॉटर घाला आणि लॅपटाॅप साफ करा.
लॅपटॉप साफ करण्यापूर्वी, तो बंद आहे आणि उर्जा स्त्रोतापासून डिस्कनेक्ट झाला आहे याची खात्री करा.
लॅपटॉपवर थेट पाणी टाकू नका.