दिवाळी हा प्रकाश आणि आनंदाचा सण आहे. येत्या 21 ऑक्टोबरपासून दिवाळीचा सण सगळीकडे साजरा केला जाणार आहे



आता सण म्हटला की गोडाधोडाचे पदार्थ, मिठाई, फराळ या गोष्टी आपसूकच आल्या



याच निमित्ताने बाजारात आपल्याला वेगवेगळ्या मिठाईंची व्हेरायटी पाहायला मिळत



मात्र, याचबरोबर भेसळीचे प्रकारही या दरम्यान होत असतात



अशा वेळी तुमची एक चूक तुम्हाला महागात पडू शकते



त्यामुळे जेव्हाही तुम्ही बाजारात मिठाई खरेदी करण्यासाठी जाल तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेवा



जेणेकरून तुमची दिवाळी आनंदी आणि सुरक्षित दिवाळी होईल. यासाठी काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.



बनावट मिठाईपासून दूर रहा

कारण या मिठाईमुळे अॅलर्जी, किडनीचे आजार आणि श्वसनाचे आजार यांसारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे रंगीबेरंगी मिठाई खरेदी करणे आणि खाणे टाळावे हे लक्षात ठेवा.

मिठाईवर चांदीचे काम पाहून गोंधळून जाऊ नका

मिठाई सुंदर बनवण्यासाठी चांदीऐवजी अॅल्युमिनियमचा वापर करतात, जे आरोग्यासाठी घातक आहे

भेसळयुक्त दूध टाळा !

माव्यातील भेसळ समजत नसेल तर त्यावर आयोडीनचे दोन ते तीन थेंब टाकून पहा. माव्याचा रंग निळा झाला तर समजून घ्या की त्यात भेसळ झाली आहे.