दिवाळीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे दिवाळी म्हटलं की, घरोघरी महिनाभर आधीच सगळ्या कामांची सुरुवात होते साफसफाई, मिठाई, फराळ या सगळ्यांचीच लगबग प्रत्येक घरात दिसून येते या सणाचे वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी लोक आपली घरे दिव्याने सजवतात आणि भरपूर मिठाई, फराळ बनवतात या खास निमित्ताने अनेकजण आपल्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजनही करतात दिवाळी पार्टीमध्ये लोक पाहुण्यांसाठी विविध प्रकारचे पदार्थ, मिठाई आणि फराळ तयार करतात आपण घरच्या घरी सोपी रेसिपी वापरून लाडू, चिवडा, चकली यांसारखे चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ तयार करू शकतो. शुद्ध तुपाचे बेसन लाडू तुम्ही घरी सहज बनवू शकता बेसनाचे लाडू बनवण्यासाठी माव्याचीही गरज नाही. बेसनाचे हे लाडू खूप चविष्ट आणि आरोग्यदायी असतात.