कोरफडीचा हा रस अतिशय आरोग्यदायी असून रोगप्रतिकारशक्तीही वाढवतो.



परंतु काही विशिष्ट परिस्थितीत याचे सेवन केल्यास शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो.



तुम्ही कोणत्याही आजारासाठी औषधे घेत असाल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच कोरफडीचा रस घ्या.



गरोदरपणातही कोरफडीचा रस पिऊ नये. कारण या काळात रस प्यायल्याने गर्भपातही होऊ शकतो



लहान मुलांनीदेखील कोरफडीचा रस पिऊ नये. त्याचे सेवन करण्यासाठी मुलाचे वय किमान 12 वर्ष असावे.



वृद्धांनीही कोरफडीच्या रसाचे सेवन करू नये. याच्या सेवनामुळे हृदयाचे अनियमित ठोके, स्नायू आकुंचन पावणे हे शरीरात अशक्तपणाचे कारण बनू शकते.



कोरफडीचा रस जास्त प्रमाणात प्यायल्याने किडनीचे आजार होऊ शकतात.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.