छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा चाहता वर्ग मोठा आहे.



'बनूं मैं तेरी दुल्हन' या मालिकेतील दिव्यांकाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.



सलग हिट मालिकांमध्ये काम केल्यानं दिव्यांका छोट्या पडद्यावरील टॉप अॅक्ट्रेस झाली आहे.



एका मुलाखतीमध्ये दिव्यांकानं तिच्यासोबत घडलेली घटना सांगितली.



दिव्यानं मुलाखतीमध्ये सांगितलं, 'माझ्यासोबत एक घटना घडली. ही घटना एका थिएटर बाहेर घडली'



'मी तिकीट विकत घेण्यासाठी लाइनमध्ये थांबले होते. तेव्हा गर्दीचा गैरफायदा घेऊन एका व्यक्तीनं मला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. 'असंही दिव्यांकानं सांगितलं.



दिव्यांका सांगितलं की, 'तेव्हा मला खूप राग आला. मी त्या व्यक्तीचा हात पकडला. तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता.'



'पण मी हाथ सोडला नाही. नंतर मी त्याचा हात ओढून त्या व्यक्तीच्या कानशिलात लगावली. त्यानंतर तेथील लोकांनी त्या व्यक्तीला मारायला सुरूवात केली. ', असं दिव्यांकानं सांगितलं.



कोणतेही फिल्मी बॅकग्राउंड नसून देखील दिव्यांकानं या क्षेत्रात करिअर करायचा निर्णय घेतला.



दिव्यांका मालिकेच्या एका एपिसोडसाठी 1.50 लाख मानधन घेते.