अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने कास्टिंग काऊचबद्दल तिच्या चाहत्यांना माहिती दिली.



अनेक लोकांनी तिचे करिअर खराब करण्याची देखील तिला धमकी दिली होती, असं दिव्यांकानं सांगितलं.



'करिअरच्या सुरूवातीला मला कम्फर्ट झोनमध्ये राहायला आवडतं होते त्यामुळे मी पार्टी तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये जायला टाळत होते.', असं दिव्यांकानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं.



मुलाखतीमध्ये दिव्यांका म्हणाली, 'जेव्हा तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये पहिला ब्रेक मिळतो. तेव्हा अनेक लोक त्याचा फायदा घेतात.'



पुढे ती म्हणाली, टतुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तुम्हाला लुटले जाते. सुरूवातीला काही माहित नसल्यामुळे कमी पैसे घेऊन तुम्हाला जास्त काम करावे लागते.'



'लोक असं सांगतात की कास्टिंग काऊचच्या शिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तुमचे करिअर संपेल.', असं दिव्यांकानं सांगितलं.



'मला माहित होतं की मला माझ्यात असणाऱ्या टॅलेंटमुळे काम मिळालं. त्यामुळे मी त्या गोष्टीचा जास्त विचार केला नाही. 'असं ही ती म्हणाली.



'ये है मोहब्बते' या मालिकेमधून दिव्यांका प्रेक्षकांच्या भेटीस आली.