अद्रकमध्ये अँटी-मायक्रोबियल, अँटीबायोटिक सारखे गुणधर्म असतात. याचे सेवन केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्यासाठी तुम्ही अद्रक दुधात मिसळून पिऊ शकता.
हिवाळ्यात येणाऱ्या विविध आजारांपासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दालचिनीचे सेवन केले जाऊ शकते.
जर तुम्ही रोज काळी मिरी खात असाल तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होईल. यासाठी तुम्ही ते बारीक करून मध आणि काळे मीठ घालून खाऊ शकता.
हळदीकडे एँटीबायोटीक म्हणून पाहिले जाते. जर तुम्ही याचा रोज वापर केला तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती तर वाढवतेच शिवाय अशा धोकादायक आजारांपासून तुमचे संरक्षणही होते.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त, त्यात ट्रेटीनोइन देखील असते ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. आवळा कोणत्याही शरीरातील हानिकारक, विषारी घटकांशी लढण्यास मदत करते.
डाळिंब या फळामध्ये अॅन्टीऑक्सिडंट, फायबर, व्हिटॅमिन्स, खनिज आणि फ्लेवोनोइड यांसारखी शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्व असतात.