अभिनेते धर्मेंद्र हे त्यांच्या हटके स्टाइलमुळे आणि फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असतात.



धर्मेंद्र सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.



धर्मेंद्र यांनी नवी वेब सीरिज (Web Series) ओटीटीवर (OTT) रिलीज होणार आहे.



वेब सीरिजमध्ये धर्मेंद्र हे सलीम चिश्ती नावाच्या सुफी संतांची भूमिका साकारणार आहेत.



धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर त्यांच्या वेब सीरिजमधील लूकचा फोटो शेअर केला होता. या फोटोला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं त्यांना ट्रोल केलं.



आता या ट्रोलरला धर्मेंद्र यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.



धर्मेंद्र यांनी शेअर केलेल्या वेब सीरिजमधील लूकच्या फोटोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'हे स्ट्रगलिंग अॅक्टरसारखं का वागत आहेत?'



नेटकऱ्याच्या या कमेंटला धर्मेंद्र यांनी रिप्लाय दिला, 'वैष्णव, आयुष्य हे स्ट्रगल आहे. तू, मी, सगळे स्ट्रगल करत आहेत. आराम करणे म्हणजे तुमच्या स्वप्नांचा प्रवास थांबण्यासारखं आहे.'



धर्मेंद्र हे 'ताज' (Taj) या आगामी सीरिजमध्ये सलीम चिश्ती नावाच्या सुफी संतांची भूमिका साकारणार आहेत.



धर्मेंद्र त्यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट देखील लवकरच रिलीज होणार आहे.