बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती नाजूक झाल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली होती.



धर्मेंद्र यांची प्रकृती नाजूक असून त्यांनी रुग्णालयात दाखल केलं आहे, अशा अफवा लोक सोशल मीडियावर पसरवत होते.



आता स्वत: धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.



व्हिडीओमधून त्यांनी या अफवा पसरवणाऱ्यांना 'पॉझिटिव्ह विचार करा', असा संदेश दिला आहे.



सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन धर्मेंद्र म्हणाले, 'पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक विचार करा मी शांत आहे पण आजारी नाही. चर्चा होत असतात. अफवा पसरत असतात. '



‘बुरा मत सुनो, बुरा मत देखो, बुरा मत करो’,हे गाणं धर्मेंद्र यांनी गाऊन दाखवले.



बॉबी देओलनं धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती.



बॉबी देओलनं धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती.



धर्मेंद्र यांच्या शोले, अपने आणि धरम वीर या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.



. एका रिपोर्टनुसार धर्मेंद्र हे लवकरच ‘अपने 2’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.