मराठ्यांच्या इतिहासातील सोनेरी पान असणारा विजयदुर्ग किल्ला पुरातत्व विभागाच्या अनास्थेमुळे अत्यंत दयनीय स्थितीत आहे.



या संदर्भात हिंदु विधीज्ञ परिषदेला माहितीच्या अधिकारात अत्यंत धक्कादायक माहिती मिळाली आहे.



विजयदुर्ग किल्ल्याच्या डागडुजीसाठी वर्ष 2014 ते 2021 या 7 वर्षांच्या कालावधीत 50 लाख 16 हजार खर्च करण्यात आले.



मुंबईतील केंद्रीय पुरातत्व विभागाच्या कार्यालयाबाहेर आम्ही आंदोलन करू, असा इशारा हिंदु जनजागृती समितीने दिला.



50 लाख रुपये खर्च करूनही काहीच बदल होत नसेल, तर यात निधीचा भ्रष्टाचार झाला असा आरोप आहे



खर्च करूनही किल्ल्याच्या सर्वत्र वाढलेली झाडे-झुडपे, अनेक वर्षे अस्वच्छ असणाऱ्या पाण्याच्या टाक्या आणि विहिरी, मोडकळीस आलेले अतिथीगृहाचे बांधकाम आहे.