जगभरासह देशातही कोरोना पुन्हा डोकं वर काढू लागला आहे कोरोना संसर्गात चढ-उतार पाहायला मिळत आहे कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्यानंतर आज कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे देशात गेल्या 24 तासांत 3714 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 26 हजार 976 वर पोहोचली आहे सोमवारी दिवसभरात 2513 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे आदल्या दिवशी 4 हजार 518 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. त्याच्या तुलनेत आज कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट पाहायला मिळाली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाची सक्रिय रुग्ण संख्यादेखील वाढताना दिसत आहे महाराष्ट्रात एकूण 7429 नवे सक्रिय रुग्ण आढळले असून मुंबईत सर्वाधिक म्हणजे 5238 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरातील असून मुंबईत 676 रुग्णांची नोंद झाली आहे राज्यात सोमवारी कोरोनामुळे कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही