इगतपुरीतील आदिवासी पाड्यावरील नागरिकांची पाण्यासाठीची वणवण काही केल्या थांबत नाही.



विहिरीत उतरुन पाणी भरण्याच्या यादीत आणखी एका गावाची नोंद झाली आहे.



इगतपुरी तालुक्यातील खैरेवाडी गावात पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष आहे.



विहिरीत 30 ते 35 फूट खाली उतरुनही गाळमिश्रित पाणी पिण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.



एक जण विहिरीत उतरतो आणि दोर लावून सोडलेल्या प्लस्टिकच्या कॅनमध्ये पाणी भरुन देतो



सकाळ-संध्याकाळ पाण्यासाठीचा हा जीवघेणा संघर्ष सुरु आहे.



लेकरा बाळांसह हंडाभर पाणी भरण्यासाठी महिलांची पायपीट सुरु आहे.



वर्षोनुवर्षे असेच पाणी भरत असूनही सुधारणा होत नसल्याने सरकारी अनास्था, उदासिनतेविषयी संताप व्यक्त होत आहे.



गुरंढोरंही पिणार नाहीत असं पाणी ग्रामस्थांनी प्यावं लागत आहे.



Thanks for Reading. UP NEXT

दिलासादायक! कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट

View next story