बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र आणि 'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी ही बॉलिवूडची लोकप्रिय जोडी आहे. त्यांची लेक ईशा देओलदेखील बॉलिवूडचा भाग आहे. ईशा देओल व्यावसायिक कामासह वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. ईशा देओल आणि भरत तख्तानी यांच्या नात्यात दुरावा आल्याचं समोर आलं आहे. बॉलिवूड लाईफच्या वृत्तानुसार, ईशाचा पती भरत याचे विवाहबाह्य संबंध असल्याचं समोर आलं आहे. भरतची गर्लफ्रेंड बंगळूरमध्ये राहणारी आहे. अद्याप देओल कुटुंबियांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही. ईशा आणि भरत 29 जून 2012 रोजी लग्नबंधनात अडकले. 'कोई मेरे दिल सौ पूछे' या सिनेमाच्या माध्यमातून ईशाने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. ईशा आणि भरत यांना राध्या आणि मिराया या दोन मुली आहेत.