ट्विंकल खन्ना वयाच्या 50 व्या वर्षी पदवीधर झाली आहे. (Photo credit : Instagram/@twinklerkhanna) बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना इंडस्ट्रीपासून दूर आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्विंकल परदेशात शिक्षण घेत होती. (Photo credit : Instagram/@akshaykumar) वय हा केवळ आकडा आहे हे तिने सिद्ध केलं आहे. पत्नीने पदवी मिळवल्यानंतर अक्षयने खास पोस्ट शेअर करत तिचं कौतुक केलं आहे. तो म्हणाला, मी सुपरवुमनसोबत लग्न केलंय. ट्विंकल खन्नाने पदवीचा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे की,अखेर मी पदवीधर झाले. (Photo credit : Instagram/@twinklerkhanna) ट्वीकलने तिचा लेक आरवसह परदेशातील विद्यापीठात प्रवेश घेतला होता. ट्विंकल खन्ना एक लेखिका म्हणून लोकप्रिय आहे. लंडन विद्यापीठात पिक्शन रायटिंग मास्टर प्रोग्रेममध्ये तिने प्रवेश घेतला. ट्विंकल खन्नावर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. (Photo credit : Instagram/@twinklerkhanna)