अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी आहे. (Photo Credit : manav manglani) नुकताच सिद्धार्थने आपला 39 वा वाढदिवस साजरा केला. सिद्धार्थ मल्होत्राच्या 'इंडियन पोलीस फोर्स' सीरिजची चाहत्यांना उत्सुकता आहे. 'इंडियन पोलीस फोर्स' हा सिद्धार्थचा पहिला अॅक्शनपट आहे. ही सीरिज 19 जानेवारी 2024 रोजी अॅमेझॉन प्राईमवर तुम्ही पाहू शकता. (Photo Credit : manav manglani) 'इंडियन पोलीस फोर्स' ही सात भागांची सीरिज आहे. या सीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा पहिल्यांदाच पोलीसाची भूमिका साकारणार आहे. या सीरिजच्या माध्यमातून सिद्धार्थ ओटीटीवर पदार्पण करत आहे. 2021 मध्ये रिलीज झालेल्या कियारा आणि सिद्धार्थ यांच्या शेरशाह या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटात सिद्धार्थनं कॅप्टन विक्रम बात्रा यांची भूमिका साकारली होती. (Photo Credit : manav manglani)