प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांचा जन्म 17 जानेवारी 1945 रोजी झाला होता. (Photo credit : Facebook/Javed Akhtar) ग्वालियर येथे एका मुस्लिम कुटुंबात जावेद अख्तर यांचा जन्म झाला. जावेद अख्तर यांचे वडील जान निसार खान हे स्वतः चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून प्रसिद्ध होते. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत जावेद अख्तर यांनी बॉलिवूडला अनेक अजरामर गाणी दिली आहेत. पद्मश्री, पद्मभूषण, साहित्य अकादमी पुरस्कार आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने पाच वेळा गौरविण्यात आलेले जावेद अख्तर यांचा आज जन्मदिवस आहे. जावेद अख्तर यांनी दोन विवाह केले आहेत. (Photo credit : Facebook/Javed Akhtar) जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीचे नाव हनी इराणी आहे. 1985 मध्ये पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेऊन जावेद अख्तर यांनी सुप्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी हिच्याशी लग्न केले. त्यांची दोन्ही मुलं सुद्धा फिल्म इंडस्ट्री मध्ये स्वतःचं स्थान निर्माण करून आहेत. (Photo credit : Facebook/Javed Akhtar) अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनादरम्यान पद्मभूषण जावेद अख्तर यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.