बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. ती एक उत्तम अभिनेत्री सोबत बॅडमिंटन चॅम्प देखील आहे. यावेळी दीपिकाने तिचे आणखी एक टॅलेंट चाहत्यांना दाखवून दिले आहे. दीपिका पदुकोणलाही लेखनाची आवड आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. तिने वयाच्या 12 व्या वर्षी एक कविता लिहिली. तिने आज सोशल मीडियावर ही कविता शेअर केली आहे. दीपिका पदुकोणने इयत्ता सातवीत असताना पहिल्यांदा कविता लिहिली. त्यावेळी ती 12 वर्षांची होती. दीपिकाच्या या कवितेचे नाव I Am असे आहे. तिने ती पहिली आणि शेवटची कविता लिहिली.