बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल कायमच चर्चेत असते. रोज ती तिचे नव-नवीन फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अमिषाने आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती बिकिनीमध्ये पोज देताना दिसत आहे. अमिषाचा हा व्हिडीओ पोस्ट होताच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अमिषाने ब्लू आणि व्हाइट स्ट्राइप बिकिनीमधील व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये ती पूलमध्ये वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये अमिषा काळा सनग्लासेस घातलेली दिसत आहे. अमिषा कधी रस तर कधी सूर्यप्रकाशाचा आनंद लुटताना दिसत आहे. तिच्या पोझवरून चाहत्यांची नजर हटत नाहीय.