अंकिता लोखंडेने केलं पुन्हा लग्न? छोट्या पडद्यारवची अभिनेत्री अंकिता लोखंडे पुन्हा विकी जैनसोबत विवाहबंधनात अडकली आहे.( स्टारप्लसच्या एका कार्य्रक्रमासाठी अंकिता मराठमोळी नवरी झाली होती. 'मम्मा तुझी इच्छा हीच आमची आज्ञा आहे ☺️😍. होय आम्ही पुन्हा लग्न केले.. माझ्या आईची इच्छा पूर्ण केल्याबद्दल starplus धन्यवाद. मला मराठी मुलगी असल्याचा अभिमान वाटतो...' अश्या कॅप्शनसह तिने हे फोटो शेअर केले आहेत. अंकिताने विकी जैनसोबत पुन्हा मराठमोळ्या स्टाईलमध्ये लग्न केलंय. या फोटोमध्ये अंकिताने निळ्या रंगाची साडी नेसलीये. अंकिता आणि विकी एकमेकांना खूप छान कॉम्पिलिमेन्ट करतायत.