'ऑस्कर 2023'मध्ये दीपिका पदुकोण खास भूमिकेत झळकत आहे. 'ऑस्कर 2023'च्या प्रेझेंटर्सच्या यादीत बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या नावाचा समावेश आहे. पहिल्यांदाच बॉलिवूड अभिनेत्रीला हा मान मिळाला आहे. दीपिकाने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील लुक सोशल मीडियावर शेअर केला आहे. दीपिकाने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील लुकचे फोटो शेअर करत #Oscars95 असं कॅप्शन लिहिलं आहे. 'ऑस्कर 2023'मध्ये दीपिकाने काळ्या रंगाचा क्लासी गाऊन परिधान केला आहे. दीपिकाच्या गाऊनला ऑपेरा ग्लोव्हजदेखील आहेत. काळ्या गाऊनसह दीपिकाने हिऱ्यांचा नेकपीसदेखील घातला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दीपिकाचा ऑस्कर लुक लुई व्हिटॉनने डिझाईन केला आहे. दीपिकाचा ऑस्कर लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.