अतिशय कमी कालावधीत हिंदी कलाविश्वात आणि ओघाओघानं आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपलं नाव मोठं करणाही अभिनेत्री म्हणजे दीपिका पादुकोण .

दीपिकानं साकारलेल्या बहुतांश भूमिका तितक्याच वेगळ्या आणि रसिकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या आहेत.

आज करिअरमध्ये यशाच्या या टप्प्यावर असूनही दीपिका तिचा मुळातील स्वभाव काही बदलू शकली नाही हेच तिचं खरं यश आहे.

दीपिका सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिचे नवनवे फोटो ती चाहत्यांपर्यंत पोहचवत असते.

दीपिकाने सध्या तिचं एक नवं फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केलेत, ज्यात ती खूप ग्लॅमरस दिसत आहे.

दीपीका पादुकोणचा 'गेहरांईया' या चित्रपट प्रेक्षकांचा वर्ल्ड प्रीमियर प्राइम व्हिडीओवर 11 फेब्रुवारी 2022 रोजी होणार आहे.