आज देशात प्राणघातक कोरोनारुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 1 लाख 72 हजार 433 नवीन रुग्ण आढळले असून 1008 जणांचा मृत्यू झाला आहे कालच्या तुलनेत आज कोरोनाचे 6.8 टक्के जास्त रुग्ण आढळले आहेत. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 15 लाख 33 हजार 921 वर आली आहे त्याचबरोबर या साथीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या चार लाख 98 हजार 983 झाली आहे आकडेवारीनुसार, बुधवारी दिवसभरात दोन लाख 81 हजार 109 लोक बरे झाले, त्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 97 लाख 70 हजार 414 रुग्ण कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत 167 कोटींहून अधिक कोरोना प्रतिबंधाक लसींचे डोस देण्यात आले आहेत काल 55 लाख 10 हजार 693 डोस देण्यात आले, त्यानंतर आतापर्यंत लसीचे 167 कोटी 87 लाख 93 हजार 137 डोस देण्यात आले आहेत