अभिनेत्री दीपिका पदुकोणने कान्स फेस्टिव्हल 2022 मध्ये तिच्या स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.

दीपिका पदुकोण आता भारतात परतली आहे.

कान्स फेस्टिव्हलमध्ये दीपिकाने फॅशनचा नवा पायंडा रचला आहे.

कधी लाँग गाऊन असो, ऑफ शोल्डर बॉडी कॉन ड्रेस किंवा हाफ पँट सूट, प्रत्येक लूकमध्ये दीपिकाचा अप्रतिम लूक पाहायला मिळाला.

कान्स फेस्टिव्हलच्या शेवटच्या दिवशीही दीपिकाने आपल्या लूकने चाहत्यांना थक्क केलं आहे.

कान्सच्या शेवटच्या दिवशी दीपिका पदुकोण पांढऱ्या साडीत रेड कार्पेटवर पोहोचली.

दीपिकाचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून आपल्या क्लासी आणि हटके लूकमुळे दीपिका चर्चेत आहे.

कान्समधल्या वेगवेगळ्या लूकने दीपिकाने चाहत्यांना घायाळ केले आहे.

दीपिका सध्या कान्स फेस्टिव्हलमध्ये ज्युरी म्हणून सामिल झाली होती.