लाल सिंह चड्ढा या चित्रपटाचा ट्रेलर काल (29 मे) रिलीज झाला.
चित्रपटामध्ये आमिर खान आणि अभिनेत्री करिना कपूर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
आमिरच्या या चित्रपटाला नेटकरी ट्रोल करत आहेत.
आमिर आणि करिनाच्या चाहत्यांची या चित्रपटाच्या ट्रेलरला पसंती मिळाली आहे.
पण काही युझर्स हे या चित्रपटाला बायकॉट करण्याची मागणी करत आहे. सोशल मीडियावर सध्या लाला सिंह चड्ढा या चित्रपटाला बायकॉट करण्यासाठी वापरण्यात आलेला हॅशटॅग ट्रेंड होत आहे.
अनेकांनी ट्विटरवर ट्वीट शेअर करुन या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. तर अनेक नेटकरी या ट्रेलरला ट्रोल देखील करत आहेत.
करिनाला काही लोक ट्रोल करत आहेत. एका मुलाखतीमध्ये करिनानं सांगितलं होतं की, लोकांनी आम्हाला स्टार बनवले आहे आणि आम्ही कोणावरही आमचे चित्रपट पाहण्याची सक्ती केलेली नाही. मी स्वतः चित्रपट पाहत नाही. करिनानं केलेल्या या वक्तव्यामुळे लोक आता 'लाल सिंह चड्ढा'ला ट्रोल करत आहेत.
लाल सिंह चड्ढा हा चित्रपट फॉरेस्ट गंप या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.
लाल सिंह चड्ढाला बायकॉट करण्याची मागणी लोक आमिरच्या काही वादग्रस्त वक्तव्यांमुळे केली जात आहे.
नेटकऱ्यांचे असे मतं आहे की, आमिरनं भारतीय संस्कृतबद्दल बरंच काही बोलला आहे, त्यामुळे त्याचे चित्रपट प्रदर्शित होऊ नयेत. एकदा आमिर खानने देश असहिष्णू झाला आहे, असं म्हटला होता.