हळदीला मिळणाऱ्या अत्यल्प भावामुळे नांदेडमध्ये हळद लागवडीच्या क्षेत्रात यंदा घट दिसून येत आहे.

एरव्ही सिंचनाची सोय असलेले शेतकरी जूनच्या पहिल्या आठवड्यातच हळद लागवड करत असतात.

मात्र, यंदा लांबलेला मॉन्सून आणि गतवर्षी हळदीला मिळालेला अत्यल्प भाव

यामुळं हळद लागवडीत फारसे शेतकरी उत्सुक नसल्याचे चित्र दिसत आहे.

सध्या राज्यातील शेतकरी मान्सूनकडे डोळे लावून बसला आहे.

कारण सध्या शेती पिकांसाठी पाण्याची खूप गरज आहे.

तसेच शेतकऱ्यांच्या पेरण्या देखील खोळंबल्या आहेत.

मात्र, पावसानं ओढ दिल्यानं बळीराजा चिंतेत आहे.

यंदा लांबलेला मॉन्सून आणि गतवर्षी हळदीला मिळालेला

अत्यल्प भाव यामुळं नांदेड जिल्ह्यात हळद लागवडीत मोठी घट झाली आहे.

खर्चिक आणि भरपूर अंगमेहनत घेत हळदीचे पीक घ्यावे लागते