नांदेडमधल्या बारडमध्ये पिवळ्या टरबूज शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. शेतकऱ्याने 15 गुंठ्यात 15 टनाचं उत्पादन घेतलं आहे.

गुलाब देशमुख यांनी 15 गुंठ्यात तब्बल 15 टनांचे उत्पादन काढले आहे. या टरबूज विक्रीतून त्यांनी तीन लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न घेतलं आहे.

गुलाब देशमुख हे गेल्या 10 वर्षांपासून टरबूज आणि खरबूज या पिकांची सातत्याने लागवड

गुलाब देशमुख यांनी कमी खर्चात चांगले उत्पादन घेतलं आहे. नियोजनपूर्वक शेती करत कष्टाच्या घामाला दाम मिळतो हे त्यांनी दाखवून दिले आहे.

गुलाब देशमुख यांच्या टरबुजाला 20 रुपये किलोप्रमाणे दर मिळाला. विशेष म्हणजे त्यांनी स्वत: या टरबुजाची विक्री केली.

नांदेड जिल्ह्यात आता पिवळ्या रंगाच्या टरबूजाची भर पडली आहे. ग्राहकांच्या गर्दीने गुलाब देशमुख यांच्या पिवळ्या टरबूजाचा गोडवा अधिक वाढला आहे.

गुलाब सखाराम देशमुख गेली वीस वर्षापासून प्रत्यक्षपणे शेती करत आहेत. केळी, हळद, टरबूज, खरबूज अशी नगदी पिके घेण्याकडे त्यांचा कल राहिला आहे.

कोरोनासारख्या भीषण काळातही त्यांनी टरबूज आणि खरबूज फळांची लागवड केली होती. उत्पादन तर चांगले होते परंतू लॉकडाऊनच्या बिकट परिस्थितीमुळं खर्चही पदरी पडला नाही.

गुलाब देशमुख यांची शेती राष्ट्रीय महामार्गालगत असल्यानं पिकांच्या संरक्षणासाठी रात्रंदिवस पहारा द्यावा लागतो. अवघ्या 100 दिवसांत तीन लाख रुपयांचे उत्पन्न जरी पदरी पडले असले तरी यामागे मोठे व्यवस्थापन असल्याचे दिसून येते.

रोप लागवडीच्या सुरुवातीस बेडवर गांडूळ खताची मात्रा आवश्यक त्या प्रमाणात वापरण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले.