3 एप्रिल रोजी देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary)यांना कन्यारत्न प्राप्त झालं.



देबिना आणि गुरमीतनं त्यांच्या मुलीचं नाव लियाना असं ठेवलं आहे.



सध्या देबिना ही तिच्या बेबी गर्लसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहे



नेटकऱ्यांच्या मते, देबिना ही बाळाला चुकीच्या पद्धतीनं धरत आहे.



देबिनानं एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये देबिना तिच्या मुलीला हातात पकडून एल्विस पस्रलीचं गाणं गाताना दिसत आहे.



व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट करुन ट्रोल केलं. तो म्हणाला, 'तुम्हाला माहित असेल की बाळाला कसं सांभाळायचं पण त्याला असं पकडण्याची पद्धत चुकीची आहे. '



ट्रोल करणाऱ्यांना देबिना म्हणाली, 'तुमच्याकडे बरेच प्रश्न आहेत की, मी माझ्या बाळाला कशी पकडते? तसेत मी माझ्या सासूला काकू का म्हणते? '



पुढे देबिना म्हणाली, 'मला यावर फक्त हेच सांगायचं आहे की मी बऱ्याचं चांगल्या लोकांसोबत राहते जे मला सुरक्षित ठेवतात.'



देबिनानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.



देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी यांनी 2011मध्ये लग्नगाठ बांधली