मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमचा फोन पुन्हा एकदा खणाणला

पण, यावेळी धमकी मुंबई उडवण्याची नाहीतर रतन टाटांसाठी आलीय

भारतातील प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांना अज्ञातानं जीवे मारण्याची धमकी

एका अज्ञात व्यक्तीनं मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला फोन केला आणि धमकी दिली

रतन टाटा यांची सुरक्षा वाढवा अन्यथा ते देखील सायरस मिस्त्री होतील, असं धमकी देणाऱ्या व्यक्तीनं म्हटलं

धमकी आल्यानंतर मुंबई पोलिसांनी तातडीनं तपासाची सूत्रं हलवली

आरोपीचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांची दोन पथकं नेमण्यात आली

एका पथकावर रतन टाटांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली

तर, दुसऱ्या पथकावर आरोपीचा शोध घेण्याची जबाबदारी दिली गेली

सर्वात आधी धमकी देणाऱ्याचं लोकेशन कर्नाटकात दाखवलं

पोलिसांनी आणखी शोध घेतल्यानंतर आरोपी पुण्याचा रहिवाशी असल्याचं समोर आलं

पोलिसांनी पुणे गाठलं, त्यावेळी आरोपी गेल्या 5 दिवसांपासून बेपत्ता असल्याचं समोर आलं

पोलिसांनी कसून शोध घेत आरोपीला ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरू केली.

चौकशीत, आरोपी मनोरुग्ण असल्याचं समोर आलं

याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.