लखनौनं गुरुवारी दिल्लीचा सहा गड्यांनी पराभव केला डिकॉकच्या वादळी अर्धशतकाच्या बळावर लखनौनं दिल्लाचा पराभव केला. आयुष बडोणीने षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला. कुलदीप यादवने या सामन्यात भेदक मारा केला, पण संघाचा पराभव टाळू शकला नाही. लखनौचा कर्णधार राहुलने 25 धावांची खेळी केली. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 149 धावा उभारल्या होत्या. दिल्लीने दिलेलं 150 धावांचे आव्हान लखनौनं 4 गड्यांच्या मोबदल्यात पार केले. डिकॉकने 52 चेंडूत 80 धावांची खेळी केली. यामध्ये दोन षटकार आणि 9 चौकार लगावले, राहुल आणि डिकॉक यांनी 73 धावांची सलामी दिली. पंतनेही 39 धावांची खेळी करत संघाची धावसंख्या 149 पर्यंत पोहचलवली.