कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी अलीकडेच बीच व्हेकेशन एन्जॉय करतानाचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत, जे खूप व्हायरलही झाले आहेत. अभिनेत्रीने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम हँडलवर ब्लॅक मोनोकिनी आणि ब्लॅक अँड व्हाइट सन हॅटमधील स्वतःचे अनेक फोटो शेअर केले आहेत. कतरिना कैफने पुन्हा एकदा तिचे सिझलिंग फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. कतरिनाने कॅमेऱ्यासमोर किलर पोज देऊन चाहत्यांना घायाळ केले आहे. कतरिना कैफ या बेसिक सॉलिड ब्लॅक बीचवेअरमध्ये जबरदस्त आकर्षक दिसते आहे. यापूर्वी कतरिना कैफने विकी कौशलसोबत बीच व्हेकेशनमधील काही सुंदर फोटो शेअर केले होते.