दिग्गज फलंदाज विराट कोहली घेतोय आंतरराष्ट्रीय टी-20 मधून ब्रेक त्यामुळे विराट आयपीएल 2023 पूर्वी टी20 सामने खेळणार नाही भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेपूर्वी विराटचा ब्रेक विराट कोहलीच्या ब्रेकबद्दल बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची इनसाइडस्पोर्ट्सला माहिती विराट टी20 सामन्यांसाठी उपलब्ध नसला तरी वनडे मालिकेतून संघात पुनरागमन करणार अशी अधिकाऱ्याची माहिती. हा ब्रेक किती काळ घेत आहे याबद्दल अद्याप स्पष्टता नाही विराट श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत मैदानात उतरेल असे अनेकांना वाटत होते. पण विराटनं ब्रेक घेण्याचा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. विराट टी20 वर्ल्डकप दरम्यानकमाल फॉर्मात होता. त्याने काही दमदार खेळी यावेळी केल्या. विराट लवकरच मैदानात परतावा अशी आशा त्याच्या फॅन्सना आहे.