इथे एक नाही, दोन नाही तर तब्बल पाच नद्यांचा संगम होतो. पाच नद्यांच्या संगमाला 'महातीर्थ राज संगम' असं म्हटलं जातं. बुंदेलखंडाच्या जालौन भागात या पाच नद्यांचा संगम होतो. या पाच नद्यांच्या संगमाला 'पंचनद' असं देखील म्हटलं जातं. बुंदेलखंडाच्या रामपुर जिल्ह्यामध्ये हा भाग येतो. इथे पाच नद्यांचा संगम होतो. या पाच नद्यामध्ये भारतातील काही मुख्य नद्यांचा समावेश आहे. यामध्ये यमुना, चंबळ, सिंधू, पहुज आणि क्वांरी या नद्यांचा समावेश आहे. इथे पवित्र स्नान करण्यासाठी अनेक लोकं येतात. अनेक लोकांच्या आस्थेचं हे स्थान असल्याचं म्हटलं जातं.