भारतात अनेक प्रमुख नद्यांचा उगम होता आणि त्या नद्यांचा प्रवाह देखील होता. त्यामुळे भारताला नद्यांचा देश म्हणून संबोधले जाते. भारतातली ब्रह्मपुत्रा ही सर्वात खोल नदी आहे. ही नदी तिबेट, भारत आणि बांग्लादेशातून वाहते. तीन देशांमधून या नदीचा प्रवाह होतो. तिबेटमध्ये या नदीला सांपो असे म्हटले जाते. ब्रह्मपुत्रा नदी ही तिबेटमधील मानससरोवरमध्ये उगम पावते. त्यानंतर तिबेटमधून ही नदी भारताच्या अरुणाचल प्रदेशामध्ये प्रवेश करते. ही नदी 2900 किमी लांब आहे. तर या नदीची खोली 380 फूट आहे.