उद्धव ठाकरे यांनी भाषणावेळी मनोज जरांगे यांचे आभार मानले.



मोदी सरकार गेलंच पाहिजे. पाशवी बहुमत असेलेलं सरकार नको असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर घणाघात केला.



कुटुंबव्यवस्था न मानणाऱ्यांनी घराणेशाहीविषयी आम्हाला सांगू नये, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींनी टोला लगावला.



जर तुम्ही मुंबईची चौकशी करताय तर तुम्ही नागपूरची पण चौकशी करा, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.



धारावीचा विकास झालाच पाहिजे, पण हक्काबरोबर जे उद्योगधंदे आहेत त्यांनी देखील सुविधा मिळायला हव्यात.



गिरणी कामरांच्या मुलांना देखील घरं द्या, असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.



'तुम्ही मुंबईची चौकशी करताय तर पीएम केअर फंडाची आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वांची चौकशी करा. '



'गद्दारांना पटकन गुजरातला पळता यावं यासाठी बुलेट ट्रेनचा घाट घातला जातोय', असं उद्धव ठाकरे म्हणाले



मुंबई महापालिकेसह लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचं आव्हान उद्धव ठाकरे यांनी सरकारला केलं आहे.



मुंबई महानगरपालिकेसह लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचं आव्हान देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलंंय.