शरीराला दररोज प्रथिनांचा पुरवठा करायचा असेल तर दही हा उत्तम पर्याय आहे.
USDA नुसार, 100 ग्रॅम दही खाल्ल्याने 11.1 ग्रॅम प्रथिने मिळू शकतात.
दही खाल्ल्याने बद्धकोष्ठता, गॅस, पोटातील उष्णता यांसारख्या समस्या दूर होतात.
आपल्या शरीरातील हाडांसाठी कॅल्शियम खूप महत्वाचे आहे. त्याच्या कमतरतेमुळे हाडे लहान आणि कमकुवत होतात.
दही खाल्ल्याने कॅल्शियमचा पुरवठा होऊ शकतो. दह्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते.
दही हे दुधापासून बनवले जात असल्याने त्यापासून थोड्या प्रमाणात व्हिटॅमिन बी 12 मिळते.
खूप थकवा आणि अशक्तपणा वाटत असेल तर दही खावे. दही खाल्ल्याने ऊर्जा आणि ताजेपणा मिळतो आणि थकवा दूर होतो.
दररोज मर्यादित प्रमाणात दही खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.
दह्याचं सेवन करावं पण मर्यादित प्रमाणात करावं.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.