मासिक पाळीत रक्त कमी जात असेल तर ओमेगा 3 फॅटी अॅसिडयुक्त अन्न खावे. यामुळे गर्भाशयाचम आरोग्य सुधारून रक्तस्त्राव सुरळीत होतो. ड्रायफ्रुट्स आणि व्हिटामीन ई चे सेवन जास्त करावे. बदाम, पिस्ता, अक्रोड आणि तीळ याची पूड करावी आणि खावी. सुके अंजीर पाण्यात मिसळून खाल्ल्याने रक्तस्त्राव सुरळीत होतो. अळशीची पूड गरम पाण्यातून घेतल्याने मासिक पाळीचा त्रास कमी होतो. संत्री , द्राक्ष , बीट , गाजर , तुळस यांचा आहारात समावेश करावा. नियमीत योगा करावा. मत्स्यासन , धर्नुरासन , भद्रासन केल्याने शरीराला फायदा होतो. पाळीत रक्तस्त्राव योग्य प्रकारे नसल्यास स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घ्यावा.