बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले असून त्या पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

सध्या या प्रकरणाचा पोलिस तपास घेत आहेत.

मुंबई पोलिसांनी आता सलमान, सलीम खान आणि बॉडी गार्डसह त्यांच्या संपर्कातील काही लोकांचा जबाब नोंदवला आहे.

सलमान आपल्या जबाबात म्हणाला, येत्या काही दिवसांत माझे कोणासोबतच भांडण झालेले नाही. ना मला कोणताही वादग्रस्त मेसेज आला आहे.

जबाब नोंदवत सलमान म्हणाला, धमकीचे पत्र मला मिळालेले नसून माझ्या वडिलांना सलीम खान यांना मिळालेले आहे.

सलमान खानचे वडील सलीम खान हे रविवारी सकाळी जॉगिंगसाठी गेले होते.

तिथे ते एका बेंचवर बसले असता, त्यांना एक पत्र मिळालं. ज्यामध्ये त्यांना आणि त्यांचा मुलगा सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

या पत्रात लिहिलं होत की, सलमान खान याचा सिद्धू मुसेवाला करून टाकू. सकाळी 7:30 ते 8:00 च्या सुमारास सलीम खान यांना हे पत्र मिळाले होते.

हे धमकीच पत्र मिळाल्यानंतर सलीम खान यांनी वांद्रे पोलीस स्थानकात एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला होता.

या प्रकरणी आता सलमान खानची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.